Skip to content

Rechab बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले.

  2. गहू घेत आहेत असे दाखवित ते घराच्या आतील भागात गेले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. नंतर रेखाब आणि त्याचा भाऊ बाअनाह तिथून निसटून गेले.

  3. ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके कापले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले.

  4. त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे शिर. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”

  5. दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ,

  6. आपण चांगले वर्तमान आणले आहे हे समजून मला एका व्यक्तीने सांगितले, ‘शौल मेला आहे’ तेव्हा मी त्याला सिकलाग येथे धरून मारून टाकले. त्याने आणलेल्या वर्तमानासाठी त्याला मी हे प्रतिफळ दिले!

  7. तर आता दुष्ट पुरुषांनी एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या घरात, त्याच्याच पलंगावर जिवे मारले आहे; मी किती विशेषकरून तुमच्या हातून त्याच्या रक्ताचा जाब घ्यावा आणि तुम्हाला या पृथ्वीतून नष्ट करावे!”

  8. तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.

  9. रेखाबाचा पुत्र मल्कीयाहने उकिरडा वेस दुरुस्त केली. मल्कीयाह हा बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी होता. ती वेस बांधल्यावर, त्याने तिचे दरवाजे उभे केले व त्यांना कड्या, अडसर व गज लावले.