मुख्य मजकुरावर जा

Quickening of the Church बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 3 पैलू

"Quickening of the Church" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या तुम्ही मला दाखविल्या आहेत, तरी तुम्ही मला नवजीवन द्याल, आणि पृथ्वीच्या गर्भातून तुम्ही मला पुन्हा वर काढाल.

  2. मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही; आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू.

  3. कारण जसा पिता मेलेल्यास उठवून जीवन देतो, तसा पुत्रही त्याच्या मर्जीप्रमाणे ज्यांना पाहिजे त्यांना जीवन देतो.

  4. फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.

  5. असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो.

  6. आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहत असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.

  7. असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे.

  8. नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो.

  9. तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.

  10. सर्वांना जीवन देणार्‍या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्‍या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो

  11. नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते.