Skip to content

Proclamation बद्दल बायबलमधील वचने

30 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच, तुम्हाला नबुखद्नेस्सर महाराजांनी उभारलेल्या या सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी लागेल.

  2. जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.”

  3. म्हणून जेव्हा त्यांनी कर्णे, बासरी, सतार, तंतुवाद्य, वीणा आणि सर्वप्रकारचे संगीत ऐकले, तेव्हा सर्व वंश आणि भाषांचे लोक पालथे पडले आणि त्यांनी राजा नबुखद्नेस्सरने प्रतिष्ठापन केलेल्या सोन्याच्या मूर्तीची आराधना केली.

  4. नबुखद्नेस्सर राजाने, जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्‍या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा: तुम्हा सर्वांची भरभराट होवो.

  5. नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले.