मुख्य मजकुरावर जा

Preciousness of Christ बद्दल बायबलमधील वचने: Illustrated

11 वचने · 13 पैलू

Illustrated बद्दल वचने

  1. जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते.

  2. माझा प्रियकर तेजस्वी आणि लालबुंद, दहा हजारात श्रेष्ठ आहे.

  3. त्याचे मस्तक शुद्ध सोन्यासारखे आहे; त्याचे केस कुरळे असून डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत.

  4. ओढ्याच्या काठावर असलेल्या, कबुतरांप्रमाणे त्याचे डोळे आहेत, जसे ते दुधात धुतलेले, रत्नजडित केल्यासारखे आहेत.

  5. त्याचे गाल सुगंधी वनस्पतीच्या वाफ्यासारखे अत्तर दरवळणारे आहेत. त्याचे ओठ गंधरस गाळणार्‍या कमळपुष्पासारखे आहे.

  6. त्याचे बाहू पुष्कराजाने सुशोभित केलेल्या सुवर्णस्तंभासारखे आहेत. त्याचे शरीर नीलम रत्नांनी सुशोभित करून उजळ केलेल्या हस्तिदंतासारखे आहे.

  7. त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले संगमरवरी स्तंभच आहेत. त्याचे रूप लबानोनासारखे आहे, उत्तम देवदारूसारखे आहे.

  8. त्याचे मुख परममधुर आहे; तो सर्वस्वी सुंदर आहे. यरुशलेमच्या कन्यांनो, हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे.

  9. “स्वर्गाचे राज्य शेतात दडवून ठेवलेल्या धनासारखे आहे. एका मनुष्याला ते सापडले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपविले आणि अतिशय आनंदाने त्याच्याजवळ होते ते सारे विकून ते शेत विकत घेतले.

  10. “पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्‍यासारखे आहे.

  11. त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले.