Skip to content

Pleasure बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.

  2. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.

  3. परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”

  4. “अगे चैनबाजीचे वेड असणारी, सुरक्षितपणे विलासणारी, आणि स्वतःला म्हणणारी, ‘मीच आहे, माझ्यासारखे कोणीही नाही. मी कधीही विधवा होणार नाही माझी लेकरे मी कधी गमावणार नाही.’

  5. पण आता या दोन्ही आपत्ती तुझ्यावर त्याच क्षणी, एकाच दिवशी, पूर्णपणे गुदरतील: तू विधवा होशील आणि तुझी मुलेही गमावशील. येथे तुझे अनेक चेटके आणि तुझा सर्व जादूटोणा असूनही हे सर्व पूर्ण मापाने भरून तुझ्यावर पडेल.

  6. तुम्ही जे सीयोनेत आरामात राहता, आणि शोमरोनच्या पर्वतावर निश्चिंत असण्याचा विचार करता की तुम्ही जे राष्ट्रातील मुख्य लोक आहात, ज्यांच्याजवळ इस्राएलचे लोक येतात, त्या तुमचा धिक्कार असो!

  7. काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत;

  8. अशा गोष्टी करणार्‍यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.

  9. आणि ज्या सर्वांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुष्टपणात आनंद मानला, त्या सर्वांना दोषी ठरविण्यात येईल.

  10. परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.

  11. विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी, परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे होतील.

  12. पूर्वी आपण देखील मूर्ख व अवज्ञा करणारे; सर्वप्रकारे बहकलेले आणि विलासवृत्ती आणि दुष्ट वासनांचे गुलाम होतो. क्रोध व हेवा यांनी आपली जीविते भरून गेली हाती आणि एकमेकांचा द्वेष करणारे होतो.

  13. व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले.

  14. इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता.

  15. त्यांनी केलेल्या हानीचे प्रतिफळ त्यांच्या पदरी पडेल. दिवसाच्या प्रकाशात चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या करताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते.