Skip to content

Onan बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. ती पुन्हा गर्भवती झाली, तिला पुत्र झाला, त्याचे नाव ओनान ठेवण्यात आले.

  2. तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.”

  3. ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये.

  4. हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले.

  5. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.

  6. एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.

  7. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)