Skip to content

Og बद्दल बायबलमधील वचने

44 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा तुम्ही येथे आला, तेव्हा हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओग लढाई करण्यासाठी आपल्यावर चालून आले, पण आपण त्यांचा पराभव केला.

  2. त्यांचा प्रदेश जिंकून आपण तो रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला वतन म्हणून दिला.

  3. आणि ज्याप्रमाणे याहवेहने अमोर्‍यांचे राजे सीहोन आणि ओगचा नाश केला, त्याचप्रमाणे या देशातील राष्ट्रांचा ते नाश करतील.

  4. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.

  5. त्याचप्रमाणे तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील अमोर्‍यांच्या दोन राजांचे—हेशबोनचा राजा सीहोन व अष्टारोथातील बाशानचा राजा ओगचे काय केले त्यासंबंधी देखील ऐकले आहे.

  6. बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले.

  7. त्याचे राज्य हर्मोन पर्वत, सलेकाह, संपूर्ण बाशानपासून गशूरी आणि माकाथी लोकांच्या सीमेपर्यंत, अर्ध्या गिलआद पासून हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत विस्तृत होते.

  8. याहवेहचा सेवक मोशे व इस्राएलच्या लोकांनी या लोकांवर विजय मिळविला आणि याहवेहचा सेवक मोशेने त्यांचा देश रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून दिला होता.

  9. म्हणजे अष्टारोथ व एद्रेईवर ज्याने राज्य केले त्या ओग राजाचे बाशानातील संपूर्ण राज्य. (रेफाईम लोकांपैकी तो शेवटचा होता.) मोशेने त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना वतनातून बाहेर घालवून दिले.

  10. त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे,

  11. अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे).

  12. उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता.

  13. “नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले.

  14. त्यांनीच मोठमोठ्या राष्ट्रांवर प्रहार केले, आणि बलाढ्य राजांचा वध केला.

  15. अमोरी लोकांचा राजा सीहोन, बाशानचा राजा ओग आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.

  16. ज्यांनी प्रतापी राजांना ठार केले— त्यांची करुणा सनातन आहे.

  17. ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला, त्यांची करुणा सनातन आहे.

  18. आणि बाशान प्रांताचा राजा ओग यालाही— त्यांची करुणा सनातन आहे.

  19. आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून, त्यांची करुणा सनातन आहे.