Skip to content

Obduracy बद्दल बायबलमधील वचने: General references

20 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वरानी त्यांच्या संदेष्ट्यांच्याद्वारे त्यांना वारंवार संदेश पाठवले, कारण त्यांनी त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या निवासस्थानावर दया केली होती.

  2. परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली.

  3. “मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.

  4. माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही, तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.

  5. चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’

  6. मग मी रागाने शपथ घेतली की, ‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

  7. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  8. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  9. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  10. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  11. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,

  12. कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.

  13. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

  14. त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.

  15. अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो, त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल.

  16. तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका, जशी रानात परीक्षा होत असताना तुम्ही बंडखोरी केली होती.

  17. ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”

  18. परंतु विसाव्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने दुसरी वेळ नेमली आहे आणि त्याला “आज” असे म्हटले. हे ते फार पूर्वी दावीदाच्या मुखाद्वारे बोलले होते, आधीच नमूद केलेल्या शब्दांत ते म्हणाले, “आज तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर किती बरे, आपली अंतःकरणे कठीण करू नका.”

  19. त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडविलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, कास्याच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही.

  20. तसेच, त्यांनी केलेले खून, चेटके, जारकर्म, त्यांच्या चोर्‍या या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही.