Skip to content

Nurse बद्दल बायबलमधील वचने: General references

7 वचने · 2 पैलू

General references बद्दल वचने

  1. तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली.

  2. यानंतर लवकरच रिबेकाहची वृद्ध दाई दबोरा, ही मरण पावली आणि बेथेलच्या खोर्‍यात एका एला वृक्षाखाली तिला मूठमाती देण्यात आली. तेव्हापासून त्या वृक्षाला अल्लोन-बकूथ असे नाव पडले.

  3. तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?”

  4. तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली.

  5. परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही.

  6. “आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा: सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे; तुझे पुत्र दूरवरून येत आहेत, तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत.

  7. वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता. जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला.