मुख्य मजकुरावर जा

Naboth बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही काळानंतर, येज्रीली नाबोथच्या द्राक्षमळ्यासंबंधी एक घटना घडली, हा द्राक्षमळा अहाब राजाच्या शोमरोनातील येज्रील राजवाड्याजवळ होता.

  2. अहाब नाबोथला म्हणाला, “तुझ्या द्राक्षमळ्यात मला भाजीपाल्याची बाग करू दे, कारण तो माझ्या राजवाड्याजवळ आहे. त्याचा मोबदला म्हणून मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देईन किंवा तुझी इच्छा असली तर त्याचे योग्य मोल मी तुला देईन.”

  3. परंतु नाबोथने अहाबाला उत्तर दिले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला द्यावे असे याहवेह माझ्या हातून कधी न घडवो.”

  4. त्यामुळे अहाब खिन्न व रागाने भरून आपल्या घरी गेला कारण येज्रीली नाबोथने त्याला म्हटले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला देणार नाही.” अहाब रुसून व अन्न खाण्यास नाकारीत आपल्या बिछान्यावर पडून राहिला.

  5. तेव्हा त्याची पत्नी ईजबेल आत आली व त्याला विचारले, “तुम्ही इतके खिन्न का आहात? तुम्ही अन्न का खात नाही?”

  6. तो तिला म्हणाला, “कारण येज्रीली नाबोथला मी म्हणालो, ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे; नाहीतर तुझी इच्छा असली तर, त्याबदल्यात त्याच किमतीत मी तुला दुसर्‍या ठिकाणी द्राक्षमळा देईन.’ परंतु तो म्हणाला, ‘मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही.’ ”

  7. त्याची पत्नी ईजबेल म्हणाली, “इस्राएलचा राजा असताना तुमचे वर्तन असे असावे काय? उठा आणि भोजन करा! आपले मन आनंदित करा. येज्रीली नाबोथचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देईन.”

  8. मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली, त्यावर त्याचा शिक्का मारला आणि नाबोथच्या शहरात त्याच्याबरोबर राहत असलेले वडीलजन व प्रतिष्ठित लोकांकडे ती पाठवली.

  9. त्या पत्रांमध्ये तिने लिहिले: “शहरात उपास जाहीर करा आणि नाबोथला सर्वात महत्त्वाच्या स्थळी बसवा.

  10. परंतु त्याच्यासमोर दोन अधम व्यक्तींना बसवावे आणि ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला त्यांना व राजाला शाप दिल्याचा आरोप त्याच्यावर आणावा. मग त्याला बाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार करा.”

  11. तेव्हा नाबोथच्या शहरात राहत असलेल्या वडीलजन व प्रतिष्ठित लोकांनी ईजबेलने लिहिलेल्या पत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे केले.

  12. त्यांनी उपास जाहीर केला व लोकांमधील अगदी महत्त्वाच्या स्थळी नाबोथला बसविले.

  13. मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली.

  14. नंतर त्यांनी ईजबेलला निरोप पाठवून म्हटले: “नाबोथला धोंडमार करून जिवे मारले आहे.”

  15. येज्रीली नाबोथला धोंडमार करून मारले आहे हे ईजबेलने ऐकताच, ती अहाबाला म्हणाली, “उठा आणि ज्या येज्रीली नाबोथने तुम्हाला आपला द्राक्षमळा पैसे घेऊन देण्यास नाकारले त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या. तो आता जिवंत नाही, तो मेला आहे.”

  16. येज्रीली नाबोथ मेला आहे असे जेव्हा अहाबाने ऐकले, तेव्हा तो उठला व नाबोथचा द्राक्षमळा ताब्यात घेण्यास निघाला.

  17. त्यानंतर तिश्बीचा एलीयाहकडे याहवेहचे वचन आले:

  18. “खाली जाऊन इस्राएलचा राजा अहाब, जो शोमरोनमध्ये राज्य करतो त्याला भेट, आता तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा म्हणून तो तिथे गेला आहे.

  19. त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू एका मनुष्याचा खून करून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली नाही काय?’ तेव्हा त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचे रक्त चाटले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझे रक्त; होय, तुझेच रक्त चाटतील!’ ”

  20. यहोरामाने फर्मान दिला, “माझा रथ तयार करा.” मग इस्राएलाचा राजा योराम आणि यहूदीयाचा राजा अहज्याह आपआपल्या रथात बसून येहूला भेटावयास निघाले. ते येहूला येज्रीली नाबोथच्या शेतात भेटले.

  21. जेव्हा यहोरामाने येहूस पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “येहू, तुम्ही शांतीने आला आहात का?” येहूने उत्तर दिले, “कशी राहील शांती, जेव्हा तुमची आई ईजबेलचे व्यभिचार आणि चेटके एवढे अधिक आहेत तोपर्यंत कशी शांती असेल?”

  22. ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!”

  23. येहूने आपला धनुष्य सर्व शक्तिनिशी ओढला आणि यहोरामाच्या दोन्ही बाहूंच्यामध्ये मारला. बाण त्याच्या हृदयात शिरला, आणि तो रथातच कोसळून पडला.

  24. तेव्हा येहूने आपला साथीदार बिदकर याला म्हटले, “त्याला उचल आणि येज्रीली नाबोथच्या भूमीत फेकून दे, कारण स्मरण कर की मी आणि तू मिळून त्याचा पिता अहाब याच्यामागून रथामधून चाललो असताना याहवेहने ही भविष्यवाणी त्याच्या विरोधात केली होती:

  25. याहवेह जाहीर करतात, ‘मी काल नाबोथचे रक्त आणि त्याच्या पुत्रांचे रक्त पाहिले आहे आणि याच भूमीवर मी याची परतफेड करेन, असे याहवेह जाहीर करतात. वध केल्याबद्दल मी त्याचा बदला अहाबाला या नाबोथच्याच भूमीवर देईन.’ म्हणून आता याहवेहच्या वचनानुसार, त्याला उचल आणि त्याला त्या भूमीवर फेकून दे.”