Skip to content

Naboth बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्‍या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला.

  2. त्याच्या सेवकांनी त्याला रथामधूनच यरुशलेमास नेले व दावीदनगरीत त्याच्या पूर्वजांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली.

  3. (अहाबाचा पुत्र योरामच्या अकराव्या वर्षी अहज्याह यहूदीयाचा राजा झाला होता.)

  4. नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली.

  5. जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?”

  6. त्याने वर खिडकीकडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाला, “माझ्या बाजूचे कोण आहेत? कोण?” तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे डोकावून पाहिले.

  7. येहूने म्हटले, “तिला खिडकीतून खाली ढकलून द्या.” तेव्हा त्यांनी तिला खाली ढकलून दिले, आणि तिच्या रक्ताच्या काही चिरकांड्या भिंतीवर आणि घोड्यांवर पडल्या आणि घोड्यांनी तिला पायाखाली तुडविले.

  8. येहू आत गेला आणि त्याने खाणेपिणे केले. तो म्हणाला, “त्या शापित स्त्रीची काळजी घ्या आणि तिला मूठमाती द्या. कारण ती एका राजकन्या होती.”

  9. परंतु जेव्हा ते तिला मूठमाती देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिची फक्त कवटी व हात आणि पायच सापडले.

  10. ते परत गेले आणि येहूला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “याहवेहचे वचन जे त्यांनी आपला सेवक एलीयाह तिश्बी याच्यामार्फत सांगितले होते ते हेच होते; येज्रीलच्या शेतात कुत्री ईजबेलचे मांस खातील.