Month बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली.
आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले.
इस्राएली लोकांची यादी—कुटुंबप्रमुख, हजार सैनिकांचा अधिकारी आणि शंभर सैनिकांचा अधिकारी आणि त्यांचे मुख्य अधिकारी, दरवर्षी प्रत्येक महिन्यात राजाच्या सर्व लष्करी सेवेसाठी या सैन्य विभागांना बोलाविले जात असे. प्रत्येक विभागात 24,000 पुरुष सैनिक असत.
पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते.
तो पेरेसाच्या वंशातील होता आणि त्याच्या नेतृत्वाची सैन्य तुकडी पहिल्या महिन्यात कामावर असे.
अहोही दोदय हा दुसर्या महिन्याच्या विभागाचा सेनापती होता; मिकलोथ त्यांचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
तिसर्या महिन्याच्या सैन्य विभागाचा सेनापती, प्रमुख याजक यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
बेनाइयाह दावीदाच्या सैन्यातील पहिल्या तीस योद्ध्यापैकी एक व त्या तिसांचा अधिकारी होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद सैन्य तुकडीचा सेनापती होता.
चौथ्या महिन्याचा चवथा सेनापती योआबाचा भाऊ असाहेल होता; त्याच्यानंतर त्याचा पुत्र जबद्याह त्याच्या जागी आला. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
पाचव्या महिन्याचा पाचवा सेनापती इज्राही शम्हूथ होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस होता, तो एफ्राईमी असून पलोन येथील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
आठव्या महिन्याचा आठवा सेनापती जेरह कुळातील हुशाथी सिब्बखय होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
नवव्या महिन्याचा नववा सेनापती बिन्यामीन अनाथोथी अबिएजेर होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती माहाराई, नटोफाथी जेरही होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती पिराथोनचा एफ्राईमी बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
बाराव्या महिन्याचा बारावा सेनापती नटोफाथी हेल्दय असून तो ओथनिएलाच्या कुटुंबातील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.
योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.
हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्याहला याहवेहकडून संदेश मिळाला.
पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील.