Month बद्दल बायबलमधील वचने: 9. Chisleu (December):
9. Chisleu (December): बद्दल वचने
तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.
योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.
हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्याहला याहवेहकडून संदेश मिळाला.