Skip to content

Meditation बद्दल बायबलमधील वचने: General references

41 वचने · 2 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.

  2. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

  3. भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह

  4. याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.

  5. माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली, मी मनन करत असताना, माझ्या अंतःकरणातील अग्नी तप्त होत होता; तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो:

  6. माझे मुख ज्ञानाचे शब्द बोलतात; माझ्या अंतःकरणाचे मनन सुज्ञतेचे असणार.

  7. उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्‍या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.

  8. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  9. असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते.

  10. माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले.

  11. दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.

  12. जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो.

  13. ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले.

  14. मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले.

  15. निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल.

  16. क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.

  17. जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते; त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्यांचे दुस्वप्न तुच्छ जाणाल.

  18. जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता,

  19. त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो!

  20. मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे: की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे.

  21. मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन; पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन.

  22. मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.”

  23. माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो, कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे.

  24. मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत, जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.

  25. मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो, आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो.