Skip to content

Magistrates बद्दल बायबलमधील वचने

22 वचने · 33 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आता दोन वेश्या राजाकडे येऊन त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या.

  2. त्यांच्यापैकी एक म्हणाली, “माझे स्वामी, मला क्षमा करा. ही स्त्री आणि मी एकाच घरात राहतो आणि ती माझ्यासोबत असताना मला एक मूल झाले.

  3. माझे मूल जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी, या स्त्रीला सुद्धा एक मूल झाले. आम्ही एकट्याच होतो; घरात आम्हा दोघींशिवाय अन्य कोणी नव्हते.

  4. “रात्रीच्या वेळी या स्त्रीचे मूल मरण पावले, कारण ती त्याच्या अंगावर झोपली.

  5. तेव्हा ती मध्यरात्री उठली आणि मी आपली दासी झोपेतच असताना माझ्याजवळ झोपलेले माझे मूल तिने घेतले आणि तिने ते तिच्या उराशी ठेवले व तिचे मेलेले मूल माझ्या उराशी ठेवले.

  6. सकाळी मी माझ्या मुलाला दूध पाजण्यासाठी उठले; आणि तो मेलेला होता! परंतु दिवसाच्या उजेडात जेव्हा मी त्याला निरखून पाहिले, तेव्हा मला समजले की मी ज्याला जन्म दिला तो हा नव्हे.”

  7. दुसरी स्त्री म्हणाली, “जिवंत असलेला मुलगा माझा आहे; मेलेला तुझा आहे.” परंतु पहिलीने हट्ट केला, “नाही! मेलेला तुझा आहे; जिवंत माझा आहे.” असा त्यांनी राजासमोर वादविवाद केला.

  8. राजाने म्हटले, “एक म्हणते, ‘माझा मुलगा जिवंत आहे आणि तुझा मुलगा मेला आहे,’ तर दुसरी म्हणते, ‘नाही! तुझा मुलगा मेला आहे आणि माझा जिवंत आहे.’ ”

  9. तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली.

  10. नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.”

  11. ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!” परंतु दुसरी म्हणाली, “तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!”

  12. तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”

  13. राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे.

  14. परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.

  15. मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे.

  16. आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे.

  17. तर आता ऊठ; या सर्वगोष्टी तुझ्या हातात आहेत. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, म्हणून धैर्य धर व योग्य ते कर.”

  18. तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्‍यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली.

  19. मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.

  20. मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे.

  21. इस्राएलांच्या पुढार्‍यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल.

  22. तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.