मुख्य मजकुरावर जा

Magistrates बद्दल बायबलमधील वचने: Samuel

9 वचने · 33 पैलू

Samuel बद्दल वचने

  1. परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.

  2. मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे.

  3. आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे.

  4. तर आता ऊठ; या सर्वगोष्टी तुझ्या हातात आहेत. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, म्हणून धैर्य धर व योग्य ते कर.”

  5. तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्‍यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली.

  6. मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.

  7. मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे.

  8. इस्राएलांच्या पुढार्‍यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल.

  9. तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.