मुख्य मजकुरावर जा

Loaves बद्दल बायबलमधील वचने: Miracle of the five

13 वचने · 2 पैलू

Miracle of the five बद्दल वचने

  1. संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, “ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”

  2. यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”

  3. त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

  4. येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.”

  5. येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.

  6. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या.

  7. जेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.

  8. दुपार टळल्यानंतर बारा शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आजूबाजूच्या खेड्यांमध्ये व गावांमध्ये जातील आणि त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतील, कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.”

  9. त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत—या सर्व लोकांस पुरेल इतके अन्न आम्ही जाऊन विकत आणले तरच हे शक्य आहे”

  10. तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती. येशू शिष्यांना म्हणाले, “अंदाजे पन्नास लोक अशाप्रकारे गटागटाने त्यांना खाली बसावयास सांगा.”

  11. तेव्हा शिष्यांनी त्याप्रमाणे केले आणि सर्व लोक खाली बसले.

  12. येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आभार मानले आणि त्या भाकरीचे तुकडे केले. नंतर त्यांनी ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.

  13. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या उचलल्या.