मुख्य मजकुरावर जा

Leprosy बद्दल बायबलमधील वचने

61 वचने · 50 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,

  2. याहवेहने मोशेला म्हटले,

  3. इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे.

  4. मग ते स्त्री असो किंवा पुरुष; त्यांना बाहेर पाठवावे. ज्या छावणीत मी तुमच्यामध्ये राहतो, ती त्यांच्यामुळे भ्रष्ट होऊ नये, म्हणून त्यांना बाहेर पाठवावे.

  5. इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”

  6. तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला.

  7. अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.”

  8. परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.

  9. दिमिष्कमधील अमानाह व परपर या नद्या इस्राएलातील जलांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यामध्ये स्नान करून मी स्वतःला शुद्ध करू शकतो की नाही?” मग तो मागे फिरला आणि क्रोधाने निघून केला.

  10. नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?”

  11. मग तो खाली गेला आणि परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सात वेळा बुड्या मारल्या आणि त्याचे शरीर पूर्ववत् होऊन लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध झाले.