मुख्य मजकुरावर जा

Lamentations बद्दल बायबलमधील वचने: Of Ezekiel

22 वचने · 2 पैलू

Of Ezekiel बद्दल वचने

  1. “इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप कर

  2. आणि म्हण: “ ‘तुझी आई सिंहांमध्ये सिंहीण होती! ती त्यांच्यामध्ये वसत होती आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले.

  3. तिच्या पिल्लांपैकी एकाला तिने वाढवले, आणि तो एक बलवान सिंह झाला. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.

  4. तेव्हा राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला गेला. त्यांनी त्याला फासात अडकवून इजिप्त देशात नेले.

  5. “ ‘जेव्हा त्या सिंहिणीने आपल्या भग्न होत असलेल्या आशा पहिल्या, तिच्या अपेक्षा गेल्या, तिने तिच्या पिल्लांमधून अजून एक पिल्लू घेतले आणि त्याला बलवान सिंह बनविले.

  6. तो इतर सिंहांमध्ये फिरू लागला, कारण तो आता बलवान सिंह होता. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.

  7. त्याने त्यांचे किल्ले मोडले आणि त्यांची नगरे उद्ध्वस्त केली. तो देश व त्यातील राहणारे सर्वजण त्याच्या गर्जनेने भयभीत झाले.

  8. तेव्हा इतर राष्ट्र व सभोवतालचे प्रांत त्याच्याविरुद्ध आले, त्यांनी त्याच्यासाठी जाळे पसरले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला.

  9. त्यांनी त्याला आकड्याने ओढून पिंजर्‍यात टाकले आणि त्याला बाबेलच्या राजाकडे आणले. त्याने त्याला तुरुंगात ठेवले, म्हणून इस्राएलच्या पर्वतांवर त्याची गर्जना पुन्हा ऐकू आली नाही.

  10. “ ‘तुमची आई तुमच्या द्राक्षमळ्यात पाण्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे होती; विपुल पाण्यामुळे ती फलदायी व फांद्यांनी भरलेली होती.

  11. तिच्या फांद्या मजबूत असून, अधिकार्‍याच्या राजदंडासाठी योग्य होत्या. झाडाच्या दाट पानांच्या वर त्या उंच वाढल्या, तिची उंची व तिच्या पुष्कळ फांद्यांमुळे ती उल्लेखनीय दिसत होती.

  12. परंतु क्रोधामुळे ती समूळ उपटली जाऊन जमिनीवर फेकण्यात आली. पूर्वेकडील वार्‍याने ती वाळून गेली, तिची फळे गळून पडली; तिच्या मजबूत फांद्या वाळून गेल्या आणि अग्नीने त्या भस्म केल्या.

  13. आता ती वेल वाळवंटात, कोरड्या व तहानेल्या भूमीवर लावली आहे.

  14. तिच्या एका मुख्य फांदीमधून अग्नी पसरला आणि तिचे फळ भस्म केले. अधिकार्‍याच्या राजदंडासाठी योग्य अशी एकही मजबूत फांदी तिच्यावर राहिली नाही.’ हे विलापगीत आहे आणि विलापगीत म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा.”

  15. “मानवपुत्रा, सोरच्या राजासाठी विलाप कर आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तू पूर्णतेची मुद्रा होता, जो ज्ञानाने भरलेला व सौंदर्याने परिपूर्ण होता.

  16. तू एदेन बागेत, परमेश्वराच्या बागेत होतास; प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजेच अलाक, पुष्कराज आणि हिरा, लसणा, गोमेद, यास्फे आणि नीलमणी, पाचू, माणिक व रत्ने अशांनी तू सजला होता. तुझ्या बैठकी व पाटे सोन्याच्या घडल्या होत्या; तू जन्मला त्याच दिवशी ते तयार केले होते.

  17. संरक्षक करूब म्हणून तुला अभिषिक्त केले, म्हणून मी तुझी नेमणूक केली. परमेश्वराच्या पवित्र डोंगरावर होता; आणि तू अग्निपाषाणात फिरत असे.

  18. तुझी निर्मिती झाली तेव्हापासून तुझ्यात दुष्टता आढळली तोपर्यंत तू तुझ्या मार्गात सरळ होता.

  19. तुझ्या विस्तारित व्यापारामुळे तू आतंकाने भरला आणि तू पाप केले. म्हणून लज्जेने मी तुला परमेश्वराच्या डोंगरावरून लोटून दिले, आणि हे संरक्षक करुबा, मी तुला अग्निपाषाणातून काढून टाकले.

  20. तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे अहंकारी झाले, आणि तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाला भ्रष्ट केले. म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिले; आणि राजांसमोर मी तुला तमाशा असे केले.

  21. तुझ्या पुष्कळ पापाने व खोट्या व्यापारामुळे तू तुझी पवित्रस्थाने विटाळलीस. म्हणून तुझ्यातून अग्नी येईल आणि तुला भस्म करेल असे मी केले, आणि सर्व बघणार्‍यांच्या देखत मी तुला राखेत मिळविले.

  22. ज्या सर्व राष्ट्रांना तुझी ओळख होती ते तुला पाहून भयभीत झाले आहेत; तुझा भयंकर अंत झाला आहे आणि तुझे अस्तित्व नाहीसे झाले आहे.’ ”