Skip to content

Labor बद्दल बायबलमधील वचने

29 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी.

  2. परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये.

  3. कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.

  4. गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.

  5. त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्‍हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  6. “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.

  7. एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.

  8. “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.

  9. त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’

  10. म्हणून ते गेले. “तो पुन्हा दुपारच्या सुमारास बाहेर गेला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही त्याने असेच केले.

  11. पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’

  12. “ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’

  13. “संध्याकाळी धन्याने आपल्या मुकादमाला सांगितले, ‘द्राक्षमळ्यामध्ये आलेल्या मजुरांना बोलवा आणि जे शेवटी आले होते त्यांच्यापासून आरंभ करून जे प्रथम आले होते त्या सर्वांना मजुरी द्या.’

  14. “तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.

  15. त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली.

  16. जेव्हा त्यांना ती मिळाली, तेव्हा त्यांनी धन्याविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली.

  17. ‘त्या माणसांनी फक्त एकच तास काम केले, तरी त्यांना तुम्ही दिवसभराची मजुरी दिली आणि आम्ही येथे सकाळपासून उन्हात दिवसभर राबलो, तरी आम्हाला तुम्ही त्यांच्यासारखेच केले.’

  18. “त्याने त्यांच्यापैकी एकाला म्हटले, ‘मित्रा, तुझ्यावर मी कोणताही अन्याय केलेला नाही; याच मजुरीत दिवसभर काम करण्याचे तू कबूल केले होतेस की नाही?

  19. मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते.

  20. माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’

  21. शांतीने जीवन जगणे, आपल्या व्यवसायात मग्न असणे आणि स्वतःच्या हाताने काम करणे हे तुमचे ध्येय असू द्या,

  22. म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

  23. कारण तुम्हाला आमचे अनुकरण कसे करावयाचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहत असताना आळशी नव्हतो.

  24. आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले.

  25. याचा अर्थ तुमच्यापासून मदत मिळण्याचा अधिकार आम्हाला नाही असे नाही, परंतु आम्ही हे यासाठी केले की तुम्ही आमचे अनुकरण करावे म्हणून तुम्हाला आदर्श झालो.