मुख्य मजकुरावर जा

Judaism बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.

  2. तुम्हाजवळ कोणी काही मागत असल्यास त्यांना द्या आणि ज्यांना उसने हवे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

  3. “ ‘तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.

  4. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

  5. “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल.

  6. त्याचप्रमाणे कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात आणि दोन्ही सुरक्षित राहतात.”