मुख्य मजकुरावर जा

Houses बद्दल बायबलमधील वचने: Liable to leprosy

20 वचने · 66 पैलू

Liable to leprosy बद्दल वचने

  1. “जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन,

  2. तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’

  3. याजकाने घरामध्ये जाऊन चिन्हाचे परीक्षण करण्यापूर्वी, त्याने घर रिकामे करण्याचा आदेश दिला पाहिजे, अन्यथा त्या घरातील सर्व वस्तू अशुद्ध होऊ शकतील. त्यानंतर याजकाने त्या घरात प्रवेश करून त्याची तपासणी करावी.

  4. त्याने घराच्या भिंतींची तपासणी करून त्यावरील चट्टा भिंतींपेक्षा खोलवर हिरवट किंवा लालसर आहे, असे याजकाला आढळले,

  5. तर याजकाने घराबाहेर दाराजवळ यावे आणि ते घर सात दिवस बंद ठेवावे.

  6. मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा भिंतीवर पसरला असेल,

  7. तर याजकाने चट्टा असलेला भाग काढून तो नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी.

  8. नंतर भिंतीचा आतील भाग पूर्णपणे खरवडून त्याची दगड व माती नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी.

  9. मग त्या जागी बसविण्यासाठी दुसरे दगड आणावेत व नव्या चुन्याचा गिलावा करावा.”

  10. दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला,

  11. तर याजकाने आत येऊन तो तपासावा, आणि जर चट्टा पसरला आहे असे त्याला दिसून आले, तर तो न निघणारा कुष्ठरोग असून ते घर अशुद्ध झाले आहे.

  12. मग ते घर पाडून टाकण्यात यावे व त्या घराचे दगड, चुना, लाकूड नगराबाहेर नेऊन अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावे.

  13. असे घर बंद असता जो कोणी त्या घरात शिरेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील,

  14. जर कोणी अशा घरात झोपेल किंवा जेवेल, तर त्याने आपली वस्त्रे धुवावी.

  15. याजकाने आत जाऊन घर पुन्हा तपासावे आणि गिलाव्यावर चट्टे पुनः दिसले नाहीत, तर ते घर शुद्ध झाले असून तेथील कुष्ठरोग नाहीसा झाला आहे असे त्याने जाहीर करावे.

  16. मग त्याने दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन शुद्धीकरणाचा विधी करावा.

  17. त्याने वाहत्या पाण्याच्या वर मातीचे पात्र धरून त्याच्यात एक पक्षी मारावे,

  18. व वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात, तसेच वाहत्या पाण्यात, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी, एजोब त्याचप्रमाणे दुसरा जिवंत पक्षी बुडवावा, आणि ते रक्त सात वेळा त्या घरावर शिंपडावे. अशाप्रकारे याजक ते घर शुद्ध करेल.

  19. And he shall cleanse the house with the blood of the bird, and with the running water, and with the living bird, and with the cedar wood, and with the hyssop, and with the scarlet:

  20. मग त्याने तो जिवंत पक्षी शहराबाहेर मोकळ्या जागी सोडून द्यावा. अशाप्रकारे त्याने घराकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे ते शुद्ध होईल.