मुख्य मजकुरावर जा

Houses बद्दल बायबलमधील वचने: Law respecting the sale of

5 वचने · 66 पैलू

Law respecting the sale of बद्दल वचने

  1. “ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.

  2. नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही.

  3. पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे.

  4. “ ‘लेवी वंशातील मनुष्याचे घर तटबंदी असलेल्या शहरात असले तरी ते त्याला केव्हाही खंडणी भरून सोडवून घेता येईल.

  5. म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे.