Families बद्दल बायबलमधील वचने: Lazarus of Bethany
Lazarus of Bethany बद्दल वचने
आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.
ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते.
तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.”
येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.”
मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती,