- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Conscience बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही. त्याऐवजी, दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा.
याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.
“डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल.
पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले, तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. म्हणून तुमच्यातील प्रकाशच जर अंधार असला, तर तो अंधार केवढा मोठा!
“कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट दिवठणीवर ठेवतात, यासाठी की आत येणार्यांनाही प्रकाश मिळावा.
तुझा डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले म्हणजे तुझे सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण जर ते दोषी असतील तर तुझे शरीरही अंधकारमय असेल.
म्हणून तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे, तो अंधार तर नाही ना, याविषयी काळजी घे.
यास्तव, जर तुझे सर्व शरीर प्रकाशाने भरलेले असले आणि कोणताही भाग अंधकारमय नसला, तर दिव्याचा प्रकाश तुझ्यावर पडेल तसे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
निश्चितच, जेव्हा गैरयहूदी लोकांजवळ नियमशास्त्र नव्हते, तरी जे नियमशास्त्रात आहे ते नैसर्गिकरित्या पाळीत होते, त्यांच्याजवळ नियम नव्हते तरी ते स्वतः नियम असे झाले.
ते प्रदर्शित करतात की नियम त्यांच्या अंतःकरणात लिहिलेले आहे; त्यांची विवेकबुद्धीच त्यांना साक्ष देते आणि त्यांचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवितात.
मी काय करतो हे मला समजत नाही. कारण जे मला करावेसे वाटते, ते मी करत नाही, जे करण्याचा मला तिटकारा येतो, तेच मी करीत असतो.
जर मी जे करू नये ते करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.
कारण या गोष्टी करणारा मी स्वतः नाही, तर माझ्यामध्ये वसत असलेले पाप करते.
माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही.
चांगले करावे असे मला वाटते, पण मी ते करीत नाही, परंतु वाईट जे मला करावेसे वाटत नाही ते मी करीत राहतो.
आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते.
योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते.
परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो.
पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
विश्वासाने दुर्बल असलेल्यांचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका.
कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु ज्याचा विश्वास दुर्बल तो शाकभाजीच खातो.
जो कोणी सर्वकाही खातो त्याने न खाणार्याला तुच्छ ठरवू नये, आणि जो कोणी सर्वकाही खात नाही त्याने खाणार्याचा न्याय करू नये; कारण परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आहे.
दुसर्याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
कोणी मनुष्य एखादा दिवस दुसर्या दिवसापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो; आणखी कोणी सर्व दिवस सारखेच मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाने पूर्ण खात्री करून घ्यावी.
जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो.