मुख्य मजकुरावर जा

Caleb बद्दल बायबलमधील वचने: One of the two survivors of the Israelites permitted to enter the land of promise

19 वचने · 9 पैलू

One of the two survivors of the Israelites permitted to enter the land of promise बद्दल वचने

  1. मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.

  2. सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता.

  3. कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही.

  4. ‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;

  5. कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ मात्र तो पाहतील, कारण त्यांनी याहवेहला पूर्ण हृदयाने अनुसरले.’

  6. याहवेहचा क्रोध इस्राएलवर भडकला व ज्या पिढीने याहवेहच्या दृष्टीने दुष्टाई केली होती त्या सर्वांचा नाश होईपर्यंत याहवेहने इस्राएली लोकांना चाळीस वर्षे रानात भटकण्यास लावले.

  7. तुम्ही जे म्हटले ते याहवेहनी ऐकले आणि ते रागावले व त्यांनी शपथपूर्वक म्हटले:

  8. “या पिढीतील एकाच्याही दृष्टीस मी त्यांच्या पूर्वजांना वचनदत्त केलेली उत्तम भूमी पडू देणार नाही.

  9. परंतु यफुन्नेहचा पुत्र कालेब, जो मला पूर्णपणे अनुसरून चालला, त्याचे पाय ज्या भूमीला लागतील ती भूमी मी त्याच्या वंशजांना देईन, कारण तो याहवेहच्या मागे पूर्ण अंतःकरणाने चालला.”

  10. यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे.

  11. जेव्हा याहवेहचा सेवक मोशेने मला कादेश-बरनेआवरून हा देश हेरण्यासाठी पाठविले होते तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो. आणि मला मनापासून जे वाटले त्याप्रमाणे मी त्याला वर्तमान दिले,

  12. परंतु माझ्याबरोबर गेलेल्या माझ्या इस्राएली बांधवांनी लोकांचे अंतःकरण भयभीत केले. तरीही मी, याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले,

  13. म्हणून त्या दिवशी मोशेने मला शपथ घेऊन सांगितले, ‘देशाच्या ज्या भागात तुझे पाऊल पडेल तो भाग तुझा आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईल, कारण तू याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले आहे.’

  14. “इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे!

  15. मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे.

  16. म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.”

  17. तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले.

  18. म्हणून तेव्हापासून हेब्रोन हे कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेबच्या मालकीचे वतन झाले, कारण त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले.

  19. (त्यापूर्वी हेब्रोनचे नाव किर्याथ-अर्बा असे होते, कारण अर्बा अनाकी लोकातील सर्वात महान व्यक्ती होता.) मग सर्व देशास युद्धापासून विसावा मिळाला.