Skip to content

Caiaphas बद्दल बायबलमधील वचने

30 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली.

  2. परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहेः तुमचे ऐकावे की त्यांचे? याचा न्याय तुम्हीच करा!

  3. ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”

  4. अशी धमकी दिल्यानंतर, त्यांनी त्यांना जाऊ दिले. त्यांना कशी शिक्षा करावी, याचा निर्णय ते घेऊ शकले नाही, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक परमेश्वराचे गौरव करीत होते,

  5. जो मनुष्य आश्चर्यकारक रीतीने बरा झाला होता, त्याचे वय चाळीस वर्षांहून अधिक होते.