मुख्य मजकुरावर जा

Brother बद्दल बायबलमधील वचने: Joseph's for his brethren

17 वचने · 5 पैलू

Joseph's for his brethren बद्दल वचने

  1. नंतर योसेफ घाईघाईने बाहेर जाऊन रडण्यासाठी जागा शोधत होता, कारण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला होता, तो आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन रडला.

  2. मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.”

  3. योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत.

  4. प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले.

  5. योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले.

  6. आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले.

  7. मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले.

  8. तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना.

  9. तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे!

  10. तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले.

  11. पण योसेफ त्यांना म्हणाला, “भीती बाळगू नका. मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे?

  12. तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत.

  13. म्हणून तुम्ही घाबरू नका; मी स्वतः तुमचा आणि तुमच्या मुलाबाळांचा पुरवठा करेन.” अशाप्रकारे त्यांच्याशी अतिशय ममतेने बोलून त्याने त्यांचे समाधान केले.

  14. योसेफ, इजिप्त देशात आपल्या पित्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहिला. तो एकशे दहा वर्ष जगला

  15. आणि योसेफाने त्याचा पुत्र एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली. तसेच मनश्शेहचा पुत्र माखीरला जन्मतः त्याच्या मांडीवर ठेवण्यात आले.

  16. नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,”

  17. नंतर योसेफाने इस्राएली लोकांना शपथ देऊन म्हटले, “परमेश्वर तुमच्या मदतीला येतील आणि मग तुम्ही निश्चितच माझ्या अस्थी या जागेवरून घेऊन जाल.”