Skip to content

Bethany बद्दल बायबलमधील वचने

33 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता.

  2. मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि तिने त्यांचे पाय आपल्या केसांनी पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.

  3. परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदाह इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला,

  4. “वास्तविक ते तेल विकून येणारे पैसे गोरगरिबांना देता आले नसते का? त्या तेलाचे मोल एका वर्षाच्या मजुरीएवढे होते.”

  5. त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला नाही, तर तो चोर होता; व पैशाच्या पिशवीचा मालक असून, जे काही त्यात टाकले जाई त्यातून स्वतःसाठी काढून घेत असे.

  6. त्यावर येशू म्हणाले, “तिला असू दे, माझ्या उत्तरक्रियेसाठी सुगंधी तेल तिने बचत करून ठेवले होते.

  7. गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर राहतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.”

  8. तितक्यात येशू तिथे आले आहेत हे कळल्यावर यहूदी लोकांचा समुदाय तिथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्या लाजराला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली.