Skip to content

Backsliders बद्दल बायबलमधील वचने

196 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील.

  2. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,

  3. ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,

  4. तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.

  5. परंतु याच वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्या समृद्धीत याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल व त्यांच्या ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुम्हाला आज देत आहे, त्या पाळण्याचे सोडून द्याल.

  6. कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल,

  7. आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल,

  8. तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल.

  9. परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:

  10. तुम्ही नगरात शापित व्हाल व शेतात शापित व्हाल.

  11. तुमच्या टोपल्या व तुमचे पीठ मळण्याचे परात शापित होईल.

  12. तुमच्या पोटचे फळ आणि तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स आणि तुमच्या कळपातील वासरे शापित होतील.

  13. तुम्ही आत याल तेव्हा शापित व्हाल आणि तुम्ही बाहेर जाल तेव्हा शापित व्हाल.

  14. जर तुम्ही याहवेहचा त्याग करून दुष्कर्मे करीत राहिलात तर तुम्ही ज्या कार्यात हात घालाल त्या प्रत्येक गोष्टीत याहवेह शाप, गोंधळ आणि संकटे आणतील व सरतेशेवटी तुमचा अचानक आणि संपूर्णपणे नाश करतील.

  15. जो देश तुम्ही प्रवेश करून ताब्यात घेणार आहात, त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत, याहवेह तुम्हावर मरी पाठवतील.

  16. याहवेह तुम्हावर क्षयरोग, ज्वर, दाह, साथीचे रोग व अवर्षण, तांबेरा व बुरशी पाठवतील, तुमचा संपूर्ण नाश होईपर्यंत या पीडा तुमचा पिच्छा पुरवतील.

  17. तुमच्या डोक्यावरील आकाश कास्यासारखे होऊन तुमच्या पावला खालील भूमी लोखंडासारखी होईल.

  18. पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील.

  19. तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.

  20. तुमची प्रेते पक्ष्यांचे आणि वन्यपशूंचे भक्ष्य होतील आणि त्यांना दूर हाकलून देण्यास तिथे कोणीही नसेल.

  21. याहवेह तुम्हावर इजिप्त देशातील गळवे, मूळव्याध, खवडे व खरूजाच्या अशा पीडा आणतील की ज्यातून तुम्ही कधीच बरे होणार नाही.

  22. याहवेह तुम्हाला वेडे व आंधळे करतील आणि तुमची मने गोंधळून जातील.

  23. ज्याप्रमाणे एखादा आंधळा मनुष्य चाचपडतो तसे, तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात चाचपडाल. जे काही तुम्ही हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळणार नाही; तुमच्यावर सतत जुलूम होत राहील आणि तुम्ही सतत लुबाडले जाल, यातून कोणीही तुम्हाला सोडविणारा राहणार नाही.

  24. तुमच्या वाग्दत्त वधूला दुसराच कोणी नेईल व तिचे शीलभंग करेल. तुम्ही घर बांधाल, पण त्यामध्ये तुम्ही राहणार नाही. तुम्ही द्राक्षमळा लावाल, पण त्या फळांचा उपभोग तुम्ही करू शकणार नाही.

  25. तुमच्या डोळ्यादेखतच तुमच्या बैलांची कत्तल करण्यात येईल, पण त्यांचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमच्यासमक्ष तुमची गाढवे जबरदस्तीने हाकलून नेण्यात येतील, पण ती तुम्हाला परत देणार नाहीत. तुमची मेंढरे तुमच्या शत्रूंना देण्यात येतील आणि त्यांना कोणीही सोडविणार नाही.