Skip to content

Ashdod बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”

  2. यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल, तो तुमचे किल्ले कोसळून टाकेल आणि तुमचे गड लुटेल.”

  3. याहवेह असे म्हणतात: “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो, तसे शोमरोनातील इस्राएल लोक जे पलंगाच्या शीरपट्टीने आणि बिछान्यावरील रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”

  4. “हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात:

  5. “ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन, त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन; वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतील आणि ती जमिनीवर पडतील.

  6. मी ग्रीष्मकालीनघर आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन; हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल भवने जमीनदोस्त होतील,” असे याहवेह जाहीर करतात.