मुख्य मजकुरावर जा

Galilee

63 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Gilgal

32.7000, 35.3000 गूगल नकाशावर पाहा

Galilee चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तिथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्‍याचा मुलगा आजारी होता.

  2. येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता.

  3. येशूंनी यहूदीयातून गालीलात आल्यानंतर हे दुसरे चिन्ह केले होते.

  4. यानंतर, येशू गालीलाच्या अवतीभोवती फिरले. त्यांना यहूदीया प्रांतातून जाण्याची इच्छा नव्हती, कारण तेथील यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यासाठी मार्ग शोधत होते.

  5. त्यांना असे सांगितल्यावर, ते गालीलातच राहिले.

  6. इतर काही म्हणाले, “हेच ख्रिस्त आहेत.” पण इतर काहीजण म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येऊ शकेल काय?

  7. त्यावर त्यांनी उत्तर दिले, “तुम्हीदेखील गालीलकर आहात काय? शोधून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही.”

  8. ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, “महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे.”

  9. शिमोन पेत्र, दिदुम म्हणून ओळखला जाणारा थोमा, गालीलातील काना येथील नाथानाएल, जब्दीचे पुत्र आणि दुसरे दोन शिष्य एकत्रित होते.

  10. ते म्हणाले, “अहो गालीलातील मनुष्यांनो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हेच येशू, ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, जसे तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात तसेच परत येणार आहेत.”

  11. नंतर यहूदीया, गालील आणि शोमरोन या प्रांतातील सर्व मंडळ्यांना शांतता लाभली आणि ते विश्वासात दृढ झाले. प्रभूचे भय धरून राहिल्यामुळे आणि पवित्र आत्म्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाली.

  12. योहानाने बाप्तिस्म्याबद्दल संदेश दिल्यानंतर गालीलापासून सुरुवात होऊन संपूर्ण यहूदीयामध्ये काय घडून आले हे तुम्हाला चांगले माहीत आहे,

  13. जे गालीलाहून प्रवास करीत यरुशलेमला त्यांच्याबरोबर आले होते, त्यांना पुष्कळ दिवस ते प्रकट झाले. तेच आता आपल्या लोकांस त्यांचे साक्षीदार आहेत.