मुख्य मजकुरावर जा

Pharaoh

138 वचने

Pharaoh चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता?

  2. फारोहकडून आल्यावर, अहरोन व मोशे आपल्याशी बोलण्यास वाट पाहत आहेत असे त्यांनी पाहिले,

  3. ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”

  4. मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.”

  5. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”

  6. “जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.”

  7. परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”

  8. आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.

  9. हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले.

  10. याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.”

  11. परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “कारण मी बोबड्या ओठांचा आहे, फारोह माझे कसे ऐकणार?”

  12. मग याहवेह मोशेला म्हणाले, “पाहा, मी तुला फारोहसाठी परमेश्वरासारखे केले आहे आणि तुझा भाऊ अहरोन तुझा संदेष्टा असेल.

  13. तुला जे काही मी आज्ञापिणार आहे ते सर्व तू बोलावयचे आणि तुझा भाऊ अहरोन याने इस्राएली लोकांना त्याच्या देशातून जाऊ द्यावे असे फारोहला सांगावयाचे आहे.

  14. पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि इजिप्तमध्ये जरी मी माझी चिन्हे व चमत्कार बहुगुणित करेन,

  15. तरीही फारोह तुझे ऐकणार नाही. मग मी इजिप्तवर माझा हात उगारेन आणि मोठ्या पराक्रमी कृत्यांच्या न्यायाने मी माझे सैन्य, माझे इस्राएली लोक यांना बाहेर काढेन.

  16. जेव्हा ते फारोहपुढे जाऊन बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता.

  17. “जेव्हा फारोह तुम्हाला म्हणेल, ‘चमत्कार करून दाखवा,’ तेव्हा अहरोनास सांग, ‘तुझी काठी घे आणि फारोहसमोर खाली टाक,’ आणि तिचा साप होईल.”

  18. मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व याहवेहने त्यांना सांगितल्याप्रमाणेच केले. अहरोनाने आपली काठी फारोहसमोर व त्याच्या सेवकांसमोर खाली जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला.

  19. तेव्हा फारोहने इजिप्तच्या ज्ञानी व मांत्रिकांना बोलाविले. त्यांनीही आपल्या गुप्त ज्ञानानुसार तसेच केले:

  20. तरी देखील याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण झाले आणि त्याने त्यांचे ऐकले नाही.

  21. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहचे हृदय कठीण आहे आणि तो इस्राएली लोकांना जाऊ देण्यास नाकारतो.

  22. फारोह सकाळी बाहेर नदीकडे जात असताना त्याच्याकडे जा. नाईल नदीच्या काठावर जाऊन त्याची भेट घे आणि ज्या काठीचा साप झाला होता, ती काठी आपल्या हातात घे.

  23. मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी, फारोहच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष उंच केली आणि नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतील सर्व पाण्याचे रक्तात रूपांतर झाले.

  24. पण इजिप्तच्या जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने पाण्याचे रक्त केले. फारोहचे मन पुन्हा कठीण झाले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.

  25. आणि फारोहने हे मनावर न घेता, तो आपल्या राजवाड्यात परतला.