मुख्य मजकुरावर जा

Bilhah

10 वचने · 3 कुटुंब सदस्य

Bilhah चा उल्लेख असलेली वचने

  1. लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली.

  2. मग ती म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार करा. जेणेकरून ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल आणि मीही तिच्याद्वारे कुटुंब तयार करू शकेन.”

  3. याप्रमाणे तिने आपली दासी बिल्हा, त्याला पत्नी म्हणून दिली, आणि याकोबाने तिचा स्वीकार केला,

  4. आणि बिल्हा गर्भवती झाली व याकोबाच्या पुत्राला जन्म दिला,

  5. राहेलची दासी बिल्हा ही पुन्हा गर्भवती झाली आणि तिने याकोबाच्या अजून एका पुत्राला जन्म दिला.

  6. तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले.

  7. राहेलची दासी बिल्हा हिचे पुत्र: दान व नफताली हे होते.

  8. याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे: योसेफ सतरा वर्षांचा तरुण असताना आपल्या भावांबरोबर, त्याच्या वडिलांच्या पत्नी बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्रांबरोबर कळप चारीत असे, तेव्हा योसेफाने, त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी वडिलांकडे आणल्या.

  9. लाबानाने आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिलेली स्त्री बिल्हा हिच्यापासून याकोबाला सात पुत्र झाले.

  10. नफतालीचे पुत्र: यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम. ही बिल्हाची संतती.