मुख्य मजकुरावर जा

Ahaz

37 वचने · 4 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Achaz

Ahaz चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला यरुशलेम शहरात पुरण्यात आले, परंतु त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत ठेवण्यात आले नाही. त्याचा पुत्र हिज्कीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  2. राजा आहाज राजा असताना त्यांच्या अविश्वासूपणामध्ये त्यांनी काढून टाकलेल्या सर्व वस्तू आम्ही तयार केल्या आहेत आणि पवित्र केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता याहवेहच्या वेदीसमोर आहेत.”

  3. यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला.

  4. जेव्हा यहूदीयाचा राजा आहाज, जो योथामचा पुत्र, जो उज्जीयाहचा पुत्र होता, अरामचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहने यरुशलेमवर हल्ला केला, परंतु त्यांच्यावर ते विजय मिळवू शकले नाहीत.

  5. तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे.

  6. पुन्हा याहवेह आहाजबरोबर बोलले,

  7. परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.”

  8. आहाज राजा मरण पावला त्या वर्षी हा संदेश मला प्राप्त झाला:

  9. मी सूर्याच्या सावलीला आहाजच्या पायऱ्यांवरून दहा पावले मागे जाईल असे करेन.’ ” तेव्हा सूर्यप्रकाश जिथून तो गेला होता, त्याच्या दहा पावले मागे गेला.

  10. यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे:

  11. यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.

  12. उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता,