Skip to content

यहोशुआ१६

योसेफाच्या गोत्राला मिळालेल्या भागाची सुरुवात यार्देनेकडून होते, यरीहोच्या पूर्वेकडील झर्‍यापासून रानातून बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत जाते.
पुढे ती बेथेल (म्हणजे लूज) पासून अर्की लोकांची सीमा पार करून अटारोथपर्यंत गेली,
पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते.
याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शेह आणि एफ्राईम यांना वतन मिळाले.
एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती: त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग
आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती.
नंतर पुढे ती सीमा यानोहापासून खाली वळून अटारोथ व नाराह येथवर जाऊन यरीहोस पोहोचून यार्देनातून आली होती.
तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.
मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती.
१०
त्यांनी गेजेरात राहणार्‍या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options