मुख्य मजकुरावर जा
गीतरत्न ६:४-१०

वराकडून वधूच्या सौंदर्याची स्तुती

गीतरत्न ६:४-१०
माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस, जसे यरुशलेम मनोहर आहे, जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे.
माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्‍या शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत.
तुझे दात नुकत्याच धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत. प्रत्येकाला आपले जुळे आहेत, त्यात एकही उणा नाही.
ओढणीआड असलेले तुझे गाल डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
तिथे साठ राण्या, आणि ऐंशी उपपत्नी, आणि कुमारिका तर असंख्य असतील;
पण हे माझ्या कबुतरे, तू परिपूर्ण, व निराळी आहेस, तिच्या आईची एकुलती एक कन्या असून, जिने तिला जन्म दिला तिची लाडकी आहे. तरुण स्त्रियांनी तिला पाहून, धन्य म्हटले; राण्या व उपपत्नी यांनी देखील तिची प्रशंसा केली.
१०
जो पहाटेसारखा प्रसन्न, चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान, मिरवणुकीतील तार्‍यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options