Skip to content
नीतिसूत्रे ५:९-२१

नीतिसूत्रे ५:९-२१

९
असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्‍यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,
१०
तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्‍याचे घर समृद्ध होऊ नये.
११
तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.
१२
तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!
१३
मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे.
१४
आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे गंभीर अडचणीत आलो.”
१५
तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.
१६
तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय, तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?
१७
ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.
१८
तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.
१९
प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.
२०
माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?
२१
कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options