- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
ख्रिस्ताचे मन
फिलिप्पैकरांस २:५-११
ख्रिस्ताचे मन
५
ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा:
६
ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;
७
उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.
८
मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
९
म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;
१०
यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,
११
परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
1 योहान २:६
जो कोणी असा दावा करतो की तो त्यांच्यामध्ये राहतो, त्याने जसे येशू राहिले तसे राहिले पाहिजे.वचन ५ मधूनमत्तय ११:२९
माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.वचन ५ मधूनयशायाह ४५:२३
मी स्वतः शपथ वाहिली आहे, माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल.वचन १० मधूनयशायाह ४५:२५
इस्राएलचे सर्व वंशज याहवेहमध्ये सुटका पावतील आणि त्यांच्याबद्दल अभिमान बाळगतील.वचन १० मधून2 करिंथकरांस ८:९
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.वचन ७ मधून1 पेत्र २:२१
यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे, यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे.वचन ५ मधून1 पेत्र ४:१
म्हणून, ज्याअर्थी ख्रिस्ताने त्यांच्या शरीरामध्ये दुःख सहन केले, त्याअर्थी तुम्ही सुद्धा तीच मनोवृत्ती धारण केली पाहिजे, कारण जो कोणी शरीरामध्ये दुःख सहन करतो तो पापाचा त्याग करतो.वचन ५ मधूनमत्तय २८:१८
मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे.वचन ९ मधूनप्रकटीकरण १९:१६
त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते: राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.वचन ९ मधूनमत्तय २०:२८
मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”वचन ५ मधून1 करिंथकरांस १०:३३
मी सर्वप्रकारे सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःचे भले पाहत नाही परंतु अनेकांचे भले पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.वचन ५ मधून1 करिंथकरांस ११:१
मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुसरण करा.वचन ५ मधून


अभ्यास टीप
Settings