Skip to content
गणना ३३:३-१५

इजिप्तपासून सिनाय पर्वतापर्यंत

गणना ३३:३-१५
पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले,
त्यावेळी इजिप्तचे लोक आपल्या सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना ज्यांना याहवेहने जिवे मारले होते त्यांना दफन करीत होते; कारण याहवेहने त्यांच्या दैवतांवरही न्याय आणला होता.
इस्राएली लोकांनी रामसेस सोडले व सुक्कोथ येथे तळ दिला.
त्यांनी सुक्कोथ सोडले आणि वाळवंटाच्या काठावरील एथाम येथे तळ दिला.
त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला.
त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला.
त्यांनी माराह सोडले व एलीम येथे गेले, त्या ठिकाणी पाण्याचे बारा झरे व खजुरीची सत्तर झाडे होती. तिथे त्यांनी तळ दिला.
१०
त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला.
११
त्यांनी तांबडा समुद्र सोडून सीनच्या रानात तळ दिला.
१२
सीनचे रान सोडून त्यांनी दोफकाह येथे तळ दिला.
१३
त्यांनी दोफकाह सोडले व अलूश येथे तळ दिला.
१४
नंतर त्यांनी अलूश सोडले व रफीदीम येथे तळ दिला. या ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते.
१५
रफीदीम सोडल्यावर त्यांनी सीनायच्या रानात तळ दिला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options