Skip to content
मीखाह १:८-१६

मीखाह १:८-१६

म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन.
कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे; ती यहूदीयामध्ये पसरली आहे. ती माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे, ती यरुशलेमपर्यंतही पोहोचली आहे.
१०
गथ मध्ये ही बातमी देऊ नका; अजिबात रडू नका. बेथ‑ले‑अफ्राह मध्ये जाऊन धुळीत लोळ.
११
शाफीर मध्ये राहणारे तुम्ही वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा. जे झानन मध्ये राहतात ते बाहेर जाणार नाहीत. बेथ‑एसल विलाप करीत आहे; ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही.
१२
मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, आणि मदतीची वाट पाहत आहेत, कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा याहवेहने पाठविलेली आहे.
१३
लाखीशमध्ये राहणार्‍यांनो, वेगवान घोडे रथाला जुंपा. तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले.
१४
त्यामुळे तू मोरेशेथ-गथला निरोपाची भेट देशील. अकजीब चे रहिवासी इस्राएलच्या राजांना फसविणारी ठरतील.
१५
मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील.
१६
ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा; गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा, कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options