Skip to content
मीखाह २:१-५

जुलूम करणाऱ्यांना धिक्कार

मीखाह २:१-५
जे वाईट कृत्याची योजना करतात, जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो! पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते.
ते लोभीपणाने इतरांची शेते बळकावतात, दुसऱ्यांची घरेही हिसकावून घेतात. ते कपटाने लोकांची घरे बळकावतात आणि त्यांच्या पूर्वजांची संपत्ती लुटतात.
म्हणून याहवेह म्हणतात: “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, कारण तो आपत्तीचा काळ असेल.
त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”
म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options