मीखाह २:६-११
६
त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका, या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका; आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.”
७
हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, याहवेह अधीर होतात काय? ते अशी कामे करतात काय? “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे माझे शब्द भले करत नाहीत काय?
८
अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले आहेत. जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता, जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात.
९
तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता.
१०
उठा, चालते व्हा! कारण हे तुमचे विश्रांतिस्थान नाही, कारण हे अशुद्ध झाले आहे, सर्व उपायांच्या पलीकडे, ते उद्ध्वस्त झाले आहे.
११
जर एखादा लबाड आणि फसवणूक करणारा येऊन म्हणाला, ‘मी तुम्हाला भरपूर द्राक्षारस व मद्याची भविष्यवाणी करेन,’ तर अशीच व्यक्ती या लोकांसाठी योग्य संदेष्टा होईल!
Settings