- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
विश्वास आणि क्षमेचा धडा
मार्क ११:२०-२६
विश्वास आणि क्षमेचा धडा
२०
सकाळी जात असताना अंजिराचे झाड मुळापासून सुकून गेले आहे असे त्यांना दिसले!
२१
पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”
२२
येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वरावर विश्वास ठेवा,
२३
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल.
२४
यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल.
२५
आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या पातकांची क्षमा करतील.
२६
पण तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”
या उताऱ्यात
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
हे देखील पहा
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
मत्तय २१:२२
तुम्ही विश्वास ठेऊन आणि प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”वचन २० मधून1 योहान ५:१४
आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात.वचन २४ मधून1 योहान ५:१५
जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे.वचन २४ मधून1 योहान ३:२२
आणि आपण जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळते, कारण आपण त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडणार्या गोष्टी करतो.वचन २४ मधूनयाकोब १:५
जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.वचन २३ मधूनयाकोब १:६
परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.वचन २३ मधूनमत्तय १८:१९
“मी तुम्हाला पुन्हा निश्चितपणे सांगतो की, या पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे एकचित्त होऊन कोणतीही मागणी करतील, तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल.वचन २४ मधूनयोहान १५:७
परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल.वचन २३ मधूनयोहान १४:१३
आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.वचन २३ मधूनमत्तय ७:७
“मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.वचन २४ मधूनमत्तय ७:११
जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील?वचन २४ मधूनयोहान १६:२३
त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल.वचन २४ मधून
हे कोठे घडते



अभ्यास टीप
Settings