Skip to content
यहोशुआ ७:६-११

यहोशुआ ७:६-११

६
तेव्हा यहोशुआने त्याची वस्त्रे फाडली आणि तो संध्याकाळपर्यंत याहवेहच्या कोशासमोर जमिनीवर तसाच पालथा पडून राहिला. इस्राएलच्या वडीलजनांनी तसेच केले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर राख शिंपडली.
७
आणि यहोशुआ म्हणाला, “हाय, सार्वभौम याहवेह, तुम्ही आम्हाला अमोर्‍यांच्या हातून ठार करणार होता, तर आम्हाला यार्देन नदी पार करून का आणले? आम्ही यार्देन पलीकडे आमच्याजवळ होते त्यातच आम्ही समाधानी होतो!
८
हे प्रभू तुमच्या सेवकाला क्षमा करा. आता इस्राएलचा त्यांच्या शत्रूकडून पराभव झालेला आहे तर मी काय बोलू?
९
कारण कनानी लोक आणि आसपासची राष्ट्रे याबद्दल ऐकतील, तेव्हा ते आम्हाला सभोवार घेरतील, आमच्यावर हल्ला करतील आणि आम्हाला नामशेष करून टाकतील. मग तुमच्या महान नावाच्या थोरवीचे काय होईल?”
१०
याहवेह यहोशुआस म्हणाले, “ऊठ! तू असा पालथा का पडला आहेस?
११
इस्राएलने पाप केले आहे; त्यांनी माझा करार भंग केला आहे, ज्याचे पालन करण्यास मी त्यांना सांगितले होते. समर्पित केलेल्या वस्तू ते घेऊन आले आहेत; त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी त्या वस्तू स्वतःच्या मालकीच्या केल्या आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options