Skip to content
यहोशुआ १९:१०-१६

यहोशुआ १९:१०-१६

१०
तिसरी चिठ्ठी जबुलून गोत्राच्या कुळांनुसार निघाली: त्यांच्या वतनभागाची सीमा सारीदपर्यंत गेली होती.
११
तिथून पुढे ती पश्चिमेकडे मरलापर्यंत व दब्बेशेथला जोडून पुढे योकनामच्या ओहोळास जाऊन पोहोचली.
१२
ती सारीदपासून वळून पूर्वेकडे उगवतीला किसलोथ-ताबोर याच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे दाबरथ आणि याफीयापर्यंत गेली.
१३
तिथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर आणि एथ-काझीनपर्यंत येते; व तिथून रिम्मोनकडे येऊन नेआहकडे वळते.
१४
तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्‍यापर्यंत जाऊन संपते.
१५
त्यात कट्टाथ, नहलाल, शिम्रोन, इदलाह आणि बेथलेहेम यांचा समावेश होता. ती बारा नगरे आणि त्यांची गावे होती.
१६
ही नगरे व त्यातील गावे जबुलून गोत्राच्या कुळानुसार वतन होती.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options