मुख्य मजकुरावर जा
योहान ७:१-१३

योहान ७:१-१३

यानंतर, येशू गालीलाच्या अवतीभोवती फिरले. त्यांना यहूदीया प्रांतातून जाण्याची इच्छा नव्हती, कारण तेथील यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यासाठी मार्ग शोधत होते.
परंतु जेव्हा यहूदीयांच्या मंडपाचा सण जवळ आला,
येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल.
ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा.”
कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता.
यावर येशूंनी त्यांना म्हटले, “माझी वेळ अद्यापि आलेली नाही; तुम्हाला कोणतीही वेळ योग्यच आहे.
जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो.
तुम्ही सणास जा. मी या सणास वर जात नाही कारण माझी वेळ अजून आली नाही.”
त्यांना असे सांगितल्यावर, ते गालीलातच राहिले.
१०
तथापि, असे असूनही, येशूंचे भाऊ सणासाठी गेल्यानंतर, येशूही, उघडपणे नव्हे, तर गुप्तपणे तिथे गेले.
११
आता सणात यहूदी पुढारी येशूंवर नजर ठेवून विचारपूस करीत होते, “की ते कुठे आहेत?”
१२
समुदायामध्ये त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती. काही म्हणत होते, “तो खरोखर चांगला मनुष्य आहे.” तर इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांची फसवणूक करतो.”
१३
परंतु यहूदी पुढार्‍यांच्या भीतीमुळे लोकांसमोर त्यांच्याविषयी बोलण्यास कोणीच धजत नव्हते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options