Skip to content
योहान ६:५५-५८

योहान ६:५५-५८

५५
कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे.
५६
जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो.
५७
मला पाठविणार्‍या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल.
५८
मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.”

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • 1 योहान ३:२४

    जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. आणि अशा रीतीने आपल्याला समजते की परमेश्वर आपल्यामध्ये राहतात: परमेश्वराने जो आत्मा आपणास दिला आहे त्याद्वारे हे आपणास समजून येते.
    वचन ५६ मधून
  • योहान १५:४

    म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.
    वचन ५६ मधून
  • योहान १५:५

    “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.
    वचन ५६ मधून
  • योहान १४:२०

    त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे व तुम्ही मजमध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे.
    वचन ५६ मधून
  • 1 योहान ४:१५

    येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकृत करतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात आणि ते परमेश्वरामध्ये राहतात.
    वचन ५६ मधून
  • 1 योहान ४:१६

    परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात.
    वचन ५६ मधून
  • प्रकटीकरण ३:२०

    पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल.
    वचन ५६ मधून
  • योहान ८:३१

    ज्या यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल.
    वचन ५५ मधून
  • योहान १५:१

    “मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.
    वचन ५५ मधून
  • योहान ३:३६

    जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो कोणी पुत्राला नाकारतो, तो जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहील.
    वचन ५८ मधून
  • योहान १:९

    जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता.
    वचन ५५ मधून
  • योहान ६:३२

    येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे.
    वचन ५५ मधून

हे कोठे घडते

All John Sites (Jerusalem)
All John Sites (Jerusalem) View full PDF
Jesus Feeds the 5000 and Walks on Water
Jesus Feeds the 5000 and Walks on Water View full PDF
All John Sites (Levant)
All John Sites (Levant) View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options