- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
योहान २०:१४-१५
१४
असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही.
१५
येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर तुम्ही कुठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.”
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
योहान २०:१३
त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कुठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.”वचन १५ मधूनयोहान २१:४
पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही.वचन १४ मधूनलूक २४:१६
परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते.वचन १४ मधूनमार्क १६:९
येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले.वचन १४ मधूनमत्तय २८:९
अकस्मात येशू त्यांना भेटले व “अभिवादन” असे म्हणाले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी त्यांचे चरण धरले आणि त्यांची उपासना केली.वचन १४ मधूनयोहान १८:७
त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?” त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.”वचन १५ मधून1 शमुवेल १:१६
तुमच्या दासीला दुष्ट स्त्री असे समजू नका; मी या ठिकाणी वेदना आणि तीव्र दुःखाने प्रार्थना करीत आहे.”वचन १५ मधूनयोहान १:३८
येशूंनी मागे वळून ते आपल्याला अनुसरत आहेत हे पाहून विचारले, “तुम्हाला काय पाहिजे?” त्यांनी उत्तर दिले, “रब्बी” म्हणजे “गुरुजी, आपण कुठे राहता?”वचन १५ मधूनमार्क १६:६
“भिऊ नका,” तो म्हणाला, “क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेवले होते ती जागा पाहा!वचन १५ मधूनमत्तय २८:५
देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे.वचन १५ मधूनगीतरत्न ३:२
मी आता उठेन आणि शहरभर फिरेन, त्याच्या रस्त्यावर आणि चौकात जाऊन; माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते त्याचा मी शोध करेन. मग मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही.वचन १५ मधूनयोहान ८:५९
हे ऐकल्याबरोबर त्यांनी येशूंना मारण्यासाठी दगड उचलले, परंतु येशू त्यांच्यापासून लपून मंदिराच्या आवारातून निघून गेले.वचन १४ मधून



अभ्यास टीप
Settings