Skip to content
योहान २:७-९

योहान २:७-९

येशू त्या नोकरांना म्हणाले, “रांजण पाण्याने भरा” त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपूर भरले.
नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातील काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.” त्यांनी तसे केले,
त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले,

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • योहान ४:४६

    गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तिथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्‍याचा मुलगा आजारी होता.
    वचन ९ मधून
  • 2 राजे ४:२

    अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?” ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.”
    वचन ७ मधून
  • 2 राजे ४:६

    जेव्हा प्रत्येक भांडे भरले गेले. ती तिच्या मुलाला म्हणाली, “आणखी काही भांडी माझ्याकडे आण.” पण त्याने म्हटले, “आता एकही भांडे शिल्लक राहिले नाही.” तेव्हा तेल वाहणे बंद झाले.
    वचन ७ मधून
  • योहान २:५

    त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.”
    वचन ७ मधून
  • योहान २:९

    त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले,
    वचन ८ मधून
  • 1 राजे १७:१३

    एलीयाह तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव.
    वचन ७ मधून
  • योहान २:३

    ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.”
    वचन ७ मधून
  • मार्क ११:२

    “समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा.
    वचन ७ मधून
  • मार्क ११:६

    येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी उत्तर दिले. तेव्हा त्या माणसांनी त्यांना जाऊ दिले.
    वचन ७ मधून
  • मार्क १४:१२

    बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रीतीप्रमाणे ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्‍याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे?”
    वचन ७ मधून
  • मार्क १४:१७

    संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले,
    वचन ७ मधून
  • नीतिसूत्रे ३:५

    तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव; आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
    वचन ८ मधून
All John Sites (Jerusalem)
All John Sites (Jerusalem) View full PDF
Jesus' First Journey from Galilee to Jerusalem
Jesus' First Journey from Galilee to Jerusalem View full PDF
John 2:1-11
John 2:1-11 View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options